|| श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर, नेवासा ||
नोंदणी क्र. - ए - १३२ | संपर्क क्र. - 7040920921
ईमेल - dnyaneshwarmaulinewasa@gmail.com
 
 
 
|| श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर ||

    ll ज्ञानेश्वरी रचना स्थान  ll



              आपण ज्या पवित्र खांबाचे (पैस ) दर्शन घेंत आहात याच खांबाला टेकून संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलीनी श्रीमद् भगवत गीता ग्रंथावर टीका अर्थात भावार्थ दिपीका नाम  ‘’ज्ञानेश्वरी ग्रंथ ‘’ प्राकृत भाषेत शके १२१२ ( इ.स .१२९० ) मध्ये सांगितला .संत ज्ञानदेव वादी भावंडे ( संत निवृत्ती नाथ ,संत सोपानदेव व संत मुक्ताबाई ) पैठणहून शुद्धी पत्र मिळवुन रेड्यासह आळंदी कडे परतीचा प्रवास करीत या पवित्र स्थानावर आली या मंदिराच्या उतरे कडून वाहणारी प्रवरा नदी व रम्य वनश्री पाहून हि ज्ञानदेव वादी भावंडे सुमारे दोन ते अडीच वर्षापर्यात इथेच ( निधी निवासी ) रमली या कालखंडात या मंदिरातील आपण पाहता ,त्या पवित्र खांबाला टेकून ‘’ ज्ञानेश्वरी ‘’ अमृतानुभवासारखी अमूल्य ग्रंथ संपन्न केले व या युगपुरुषाने सामाजिक समतेचा संदेश याच पवित्र मंदिरातून जगाला दिला .

                या जागेवर पंधराव्या शतकापर्यंत करविरेश्वराचे मंदिर होते .काळ ओघाने ते मंदिर नष्ट ( क्षतीग्रस्त ) झाले ,परंतु माऊलीनी स्पर्श केलेला हा पवित्र खांब  ऐकमेव अवशेष म्हणून उभा आहे .या पवित्र खांबासाठीं मंदिर उभारण्यात आले .त्याचा जीर्णोद्धार छोट्या प्रमाणात दोनदा करण्यात आला .त्यानंतर इ.स.१९३९ मध्ये ह.भ.प.बन्सी महाराज तांबे ,रा .रांझणगाव (देवी) ता .नेवासा ,जि.अहमदनगर या वैष्णवाने आपली वडीलोपर्जित इस्टेट विकून संपूर्ण आयुष्याचे योगदान देऊन या भव्य मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य त्यांचे गुरुदेव सोनोपंत दांडेकर यांचे प्रेरणेने व तमाम महाराष्ट्रीय संत ज्ञानेश्वर भक्तांच्या सहकार्याने हे मंदिर साकार झाले .

                खांबासाठी मंदिर असणारे हे जगप्रसिद्ध एकमेव पवित्र स्थान आहे .या पवित्र खांबाच्या स्पर्शाने सहवासाच्या आठवणीने तो एक चिरंजीव प्रतिक झाला आहे .तो स्पर्श आपले जीवन प्रकाशमय आनंदमय करो |      

  

|| गुरुमाऊली ||
www.dnyaneshwarmaulinewasa.org